शनिवार, ८ एप्रिल, २०२३

सांगली: उदमांजराची शिकार करणारी टोळी वन विभागाच्या ताब्यात

सांगली : उदमांजराची शिकार करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिकाऱ्यांच्या सहा जणांच्या टोळीला वनविभागाने भाटवाडी (ता.वाळवा) येथेहताब्यात घेतले असून टोळीविरुध्द वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाटवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील तलावाकाठी शिकारीच्या उद्देशाने काही संशयित लोक वन्यप्राणी शिकारीच्या उद्देशाने फिरत असलेची माहिती वनविभागास मिळाली. सदर माहिती मिळताच महंतेश म. बगले, वनक्षेत्रपाल शिराळा, अजितकुमार पाटील मानद वन्यजीव रक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली दिपाली सागावकर, अनिल पाटील कायम वनमजूर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी चारचाकी गाडीतून पळून जाणेच्या तयारीत असलेल्या लोकांना मोटारीसह अडवून गाडीचा तपास घेतला असता, आसनाखाली लपवून ठेवलेला वन्यप्राणी उदमांजर (इंडियन स्मॉल सिवेट) आढळला. टोळीतील ६ संशयीत आरोपींना ताब्यात घेतले व असून त्यांच्याकडील मृत उद मांजरसह वाघर, विजेरी, अल्टो चार चाकी आणि १ दुचाकी गाडी इत्यादी मुद्देमाल जप्त करणेत आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

क्रिकेट

केजमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्याने केलाअल्पवयीन मुलीचा विनयभंग

केज : पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीला गाडीत बसवून नेत तिचा विनयभंग केल्याची घटना घडलीय...