शनिवार, ८ एप्रिल, २०२३

MPSC Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘या’ १४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

MPSC Medical Recruitment 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगात(MPSC) लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. आयोगाकडून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना २ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी (महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ) या पदासाठी भरती जाहीर केली आहे. तर या भरती अंतर्गत जवळपास १४६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती एमपीएससीने जाहिरात क्रमांक 017/2023 मध्ये दिली आहे.

एकूण रिक्त पदे – १४६
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.

आरक्षित प्रवर्गाला ५ वर्ष सूट देण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – ३९४ रुपये.

आरक्षित – २९४ रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात १० एप्रिल २०२३ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ मे २०२३

उमेदवारांनी अर्ज भरण्यापुर्वी https://drive.google.com/file/d/1Poc9fbJe0ytHd1RFzPWKnxmeu0stnVrt/view या लिंकवरील जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी आयोगाच्या https://www.mpsc.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

क्रिकेट

केजमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्याने केलाअल्पवयीन मुलीचा विनयभंग

केज : पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने एका अल्पवयीन मुलीला गाडीत बसवून नेत तिचा विनयभंग केल्याची घटना घडलीय...