स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजेंच्या सूचनेनुसार 'स्वराज्य'च्या वतीने राज्यभरात १०० पेक्षा जास्त ठिकाणी 'खड्डे बुजवा-अपघात वाचवा" आंदोलन शुक्रवार दि. २८ जुलै २०२३ रोजी बीड शहरामध्ये धानोरा रोड येथे पार पडले.
बीड शहरातील जनतेच्या करातून कोट्यावधी रुपयांची रस्त्यांची कामे करण्यात आली परंतू ही अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली असुन विविध ठिकाणी खड्ड्यांचा भरमसाठ साठा बीड शहरात दिसुन येत आहे. याचा विपरीत परिणाम सर्वसामान्य माणासांवर होत असून दैनंदिन जीवनात वाहतुक करताना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे..किंबहूना सामान्य माणसाला आपला जीव गमवावा लागत आहे.
याच अनुषंगाने आज 'स्वराज्य' संघटनेच्या वतीने बीड शहरामध्ये धानोरा रोड येथे खड्यामध्ये बेशरम चे झाड लावून,खड्यामध्ये फुल टाकून पूजा करण्यात आली तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच आंदोलनातील युवकांच्या क्रोधाला आळा न बसल्याने "सगळे आलेत आता एकाच पक्षात...रस्ते मात्र नाही कोणाच्याच लक्षात...!" या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणला.
तरी या आंदोलनासाठी स्वराज्याचे चंद्रशेखर कदम,सुरज जायभाये,शिवराज माने,अंगद मोहिते,नारायण सपकाळ,महेश भिसे,ज्ञानराज ढवळे,किशोर गवते,सुदर्शन डोके,आदमने ओंकार,निखिल शिंदे,योगेश नायर,हनुमान डोंगरे,यांसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा